Breaking News

चक्रीवादळामुळे खंडीत झालेला विजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 22, 2021 4:53 pm
|

पालघर मंडळातील वीज वितरण यंत्रणेला ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे पालघर महावितरण मंडळातील वीजपुरवठा खंडित झालेल्या विजवाहिन्याचा व उपकेंद्राचा वीज पुरवठा युद्ध पातळीवर सुरू करण्याचे काम महावितरण कर्मचारी, अधिकारी(४२५) व ठेकेदारांचें कामगार (५१६)असे अंदाजे ९४१ जण अहोरात्र काम करत आहेत.

आतापर्यंत सर्व उपकेंद्रांचा व उच्चदाब वाहिन्याचा वीजपुरवठा सुरू करून ३ लाख ७४ हजार वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांपैकी ३ लाख ३४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला आहे. आज उर्वरित सर्व ३७ गावांचा वीजपुरवठा सुरू होईल असे नियोजन केले आहे.त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. सदर काम करत असताना जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व सर्व विजग्राहकांनी मदत व सहकार्य केले आहे. या वादळात महावितरणचे अंदाजे रु.५.२५ कोटीचे नुकसान झाले आहे

दरम्यान , तोक्ते चक्रीवादळाच्या कालावधीत कोव्हिड रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी ऑक्सीजनचा पुरेसा साठा करण्यात आला होता. चक्रीवादळामुळे, शेती तसेच फळपिकांचे त्याचबरोबर मच्छीमार, वीटभट्टी कुक्कटपालन आदिचे नुकसान झाले आहे. शासनाच्या निकषानुसार त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी म्हटले आहे.तसेच जिल्ह्यातील जव्हार, डहाणू आणि पालघर येथे ऑक्सीजन निर्मिती करण्यासाठीचा प्रकल्प येत्या महिन्याभरात पुर्णत्वास येईल असेही पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 22, 2021, 4:53 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *