Breaking News

‘तुमचा काळ संपलाय. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार’; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 19, 2021 5:14 pm
|

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळ येथे दाखल झाले. यावेळी नारायण राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो. मी त्यांना एवढेच सांगितले की, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला असायला हवे होतात. मला बाळासाहेबांनीच घडवलेले आहे, दिलेले आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असेच यश मिळव आणि प्रगती कर माझा आशीर्वाद आहेत. असे म्हणत त्यांनी डोक्यावर हात ठेवला असता. आज त्यांचा हात नसला तरी आशीर्वाद माझ्यासोबत आहेत’ असे राणे म्हणाले.

“महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघालेल्यांना सांगू इच्छितो की, तुमचा काळ संपलाय. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे, असा विश्वास व्यक्त करत यावेळी राणेंनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बळ आणण्याचा प्रयत्न केला आहे.“महाराष्ट्रातील सरकाराने गेल्या अडीज वर्षात कोणताही विकास केलेला नाही. उद्धव ठाकरे हे राज्याला उद्वस्त करत आहेत. आता हे सरकार हटविण्याची वेळ आली आहे. आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी जोमाने काम करावं लागेल, कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, अशा सूचनाही यावेळी राणेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

नारायण राणे यांनी बोलताना मुंबई महापालिका निवडणुकांवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचेच सरकार येईल. मुंबई महापालिका जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. ही महापालिका काही झाले तरी आम्ही जिंकणारच, असा निर्धार राणेंनी व्यक्त केला.

दरम्यान, नारायण राणे यांचे सकाळी 11 वाजता मुंबई विमानताळवर आगमन झाले. त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 19, 2021, 5:14 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *