Breaking News

Maratha Reservation |: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील ठाम; आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: October 25, 2023 1:51 pm
|

मुबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गेल्या महिन्यापासून आंदोलन सुरू केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं होतं. त्यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाला 30 दिवसांचा वेळ देण्यात आला होता. त्यावर अधिकचे 10 दिवसही दिले पण या मुदतीमध्ये सरकारने अद्याप मराठा आरक्षण जाहीर केलेले नाही त्यामुळे ही मुदत संपल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहे. प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. नंतर 27 ऑक्टोबर पासून ते आमरण उपोषण करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा जाहीर करतील.मनोज जरांगे पाटील यांनी पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आजपासूनचे उपोषण हे विना पाणी आणि औषधाचे असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये नेत्यांनाही गावाबंदी केली असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी आता सरकार बोलणी कशी करणार हे पहावं लागेल.

याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. गिरीश महाजन म्हणाले, “राज्य शासनाला मराठा समाजाला टिकणार आरक्षण (Maratha Reservation) द्यायचं आहे. आम्ही शब्द दिला आहे. गेल्यावेळी आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, त्यामुळे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या. त्याचबरोबर या मुद्द्यावरून तुम्ही कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेऊ नका. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही काम करत आहोत, त्याचबरोबर आम्ही तुम्हाला आरक्षण देणारच आहोत. या मुद्द्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण करणार नाही. आम्हाला थोडा वेळ मिळाला तर चांगला मार्ग निघेल, त्यामुळं तुम्ही आम्हाला थोडी संधी दिली पाहिजे.”

गिरीश महाजन यांना मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही. मागील काही दिवसात आरक्षण प्रश्नी 3-4 तरूणांनी जीव दिला आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असं तुम्ही म्हटलं होतं. मात्र, अद्याप ते देखील झालेलं नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी तुम्ही एक महिन्याचा वेळ मागितला होता. परंतु, आम्ही तुम्हाला त्याहून अधिक दिवस दिले. परंतु, अजून देखील आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही.”


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: October 25, 2023, 1:51 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *