Breaking News

अनिल परब यांच्य अडचणी वाढणार ? किरीट सोमैयांनी घेतली राज्यपालांची भेट

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 22, 2021 11:06 am
|

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी चक्क समुद्रकिनाऱ्यावर रिसॉर्ट उभा केला. अनधिकृतपणे उभारलेल्या या रिसॉर्टवर कारवाई करावी, सीआरझेडचा भंग, वन व पर्यावरणाचे नुकसान, सरकारी दस्तऐवजात खाडाखोड व मंत्रीपदाचा दुरुपयोग याबाबत कारवाई करण्याची मागणी भाजपातर्फे राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

भाजपा नेते किरीट सोमैया यांच्या सह खासदार गोपाळ शेट्टी, आमदार राम कदम, आमदार मिहीर कोटेचा, आमदार राहुल नार्वेकर, मुंबई महामंत्री संजय उपाध्याय, युवराज मोरे आणि सिद्धार्थ शर्मा ह्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन लेखी तक्रार केली. हा रिसॉर्ट शेतजमिनीवर अनधिकृतपणे बांधलेला आहे.याबाबत भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी स्थानिक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.

अनिल परब यांनी ही जागा पुण्याचे श्री. विभास साठे यांच्याकडून विकत घेतली.सोमैया यांनी साठे यांच्याकडे व संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यावर हे स्पष्ट झाले आहे की अनिल परब यांनी जागेचा ताबा घेतला त्यावेळी या शेत जमीनवर एक फूटही बांधकाम नव्हतं, झोपडही नव्हतं. या संबंधीचे गुगल मॅप/अर्थ चे नकाशे ही राज्यपालांना भाजपाच्या शिष्टमंडळाने दाखविले.

त्यामुळे सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या रिसॉर्ट संदर्भात तक्रार केली आहे. अनिल परब यांच्यावर मंत्रीपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाउनच्या नियमांना डावलून 2020 मध्ये तीन मजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी सोमय्या यांनी केली होती.भाजपाचय शिष्टमंडळानेही राज्यपालांची भेट घेऊन परब यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांना केली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 22, 2021, 11:06 am
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *