Breaking News

फडणवीस पंढरपुरात म्हणाले, सत्ता बदलायची माझ्यावर सोडा,आपण बदलू,’, मलिक म्हणतात, “ना नौ मन तेल होगा, ना राधा नाचेगी!”

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 12, 2021 6:28 pm
|

सोलापूर : पंढरपूर – मंगळवेढा (pandharpur mangalavedha) मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके (bharat bhalke) यांच्या निधनानंतर या मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली आहे. दरम्यान, या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने असून , पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात मोठ्या नेत्यांच्या सभा चांगल्या गाजत आहेत.

दरम्यान, देवेद्र फडणवीस पंढरपुरच्या सभेत बोलताना ते म्हणाले की, लोक विचारतात की, ही फक्त एका मतदारसंघाची निवडणूक आहे, त्याने काय फरक पडणार आहे. याने काय सरकार बदणार आहे का? सरकार कधी बदलायचं हे माझ्यावर सोडा, आपण सरकार बदलू असा सूचक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. यावर नवाब मलिकांनी उतार देत म्हटले की , “पंढरपूरमध्ये मतं मागत असताना त्यांचा कार्यक्रम करु असे सांगून ते लोकांकडून मदत मागत आहेत . त्यांना घाबरवत आहेत हे काम देवेंद्रजीनी केले आहे. आणि गेले पंधरा महिने भाजप हेच करू इच्छित आहे. मी त्यांना सांगू इच्छितो मी “ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी” हे सरकार पाच वर्ष टिकून आपला कालावधी पूर्ण करेल”, असं म्हणत “ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी” हा हिंदीतील एक वाकप्रचार आहे. न होणाऱ्या किंवा अशक्य गोष्टींबाबत बोलणं असा या वाकप्रचाराचा अर्थ आहे. त्याचाच आधार घेत नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांना ठणकावलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

यांच्या वसुलीमुळे सामान्य माणूस पोलीस स्टेशनला गेला तर त्याला न्याय मिळत नाही. “जे काय मुंबई मध्ये घडलं ते भयानक आहे. या ठिकाणी पोलिसांना जर हफ्तेवसुली करण्यासाठी नेमुन दिले जात असेल, तुम पचास करोड जमा करो, तुम १०० करोड जमा करो, तो काय स्वतःच्या खिशातले देतोय का? तो गोरगरिबांना नडतोय, त्याच्या खिशातून तो पैसे काढतोय. यांच्या वसुलीमुळे सामान्य माणूस पोलीस स्टेशनला गेला तर त्याला न्याय मिळत नाही. आज या ठिकाणी गांधी दर्शन ज्याला त्यालाच न्याय आहे,. गांधी दर्शनाशिवाय न्याय नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.”

दरम्यान, पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील आणि मुंबईतील पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून ओळखल जात होत. मुंबईच्या पोलीस दलाला स्कॉटलँडच्या यार्डशी तुलना केली जात होती. मात्र, आज त्या पोलीस दलात रोज नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. आणि तो किस्सा ऐकल्यावर आपण नेमकं कुठे चाललो आहोत, असा प्रश्न निर्माण होत आहे. “मंत्रीविचारत आहेत की, अरे तीनशेच बारचे पैसे का येतात? सतराशे बार आहेत उरलेल्या बारचे पैसे का येत नाहीत” असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 12, 2021, 6:28 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *