VIDEO पहा ;नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या जवान राकेश्वर सिंग कशी झाली सुटका
विजापूर – 3 एप्रिलला जोनागुडामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेले जवान राकेश्वर सिंह नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडले होते. आता पाच दिवसानंतर नक्षलवाद्यांनी त्यांना सोडून दिले आहे आणि तो विजापूरमधील सीआरपीएफ कॅम्पमध्ये सुखरूप दाखल झाला आहे. त्याचा नक्षलवाद्यांच्या ताब्यात असतानाचा विडिओ छत्तीसगडमधील विजापूरचे पत्रकार गणेश मिश्रा यांनी काढला आहे. तो एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.
https://twitter.com/ANI/status/1380166699618459650
जवान राकेश्वर सिंग मन्हास याला दोरखंडाने बांधले आहे. समोर शेकडो सशस्त्र नक्षलवाद्यांची गर्दी आहे आणि दोन सशस्त्र नक्षलवादी राकेश्वर सिंगच्या दंडाला बांधलेले दोखखंड सोडत आहेत, असा हा जंगलातला व्हिडीओ आहे. या विषयी गणेश मिश्रा यांनी एएनआयला माहिती दिली. ते म्हणाले, की मी जेव्हा राकेश्वर सिंगला नक्षलवाद्यांच्या कॅम्पमध्ये पाहिले, तेव्हा त्याला किरकोळ जखमा झालेल्या दिसल्या.अपहृत कोब्रा जवान राकेश्वर सिंग मन्हासला नक्षलवाद्यांनी सोडले चकमकीच्या दुसऱ्याच दिवशी नक्षलवाद्यांनी त्याला पकडल्याचे त्याने मला सांगितले. पण तो तेव्हाही सुखरूप होता आणि आताही सुखरूप आहे. त्याची तब्येतही ठीक आहे, अशी माहिती गणेश मिश्रा यांनी दिली.
दरम्यान, राकेश्वर सिंग यांच्या सुखरूप सुटकेची माहिती मिळताच राकेश्वर यांच्या सुटकेनंतर पत्नी मीनू यांना आनंद अनावर झाला असून सरकारचे आभार मानले आहेत. आणि जम्मूतील त्यांच्या घरी जोरदार सेलिब्रेशन सुरू झाले असून आसपासचे नागरिकही या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 8, 2021, 10:23 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY