Breaking News

पोलिसांवर कडक पावले उचलण्याची वेळ येऊ देऊ नका’; मुंबई आयुक्तांकडून नागरिकांना इशारा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 16, 2021 8:23 pm
|

मुंबई : वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही मुंबईसह अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आणखी कठोर निर्बंध लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, हेमंत नगराळे यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात 15 दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. मात्र, अजून सुद्धा काहीजण राज्य सरकारच्या सूचनांचे पालन न करता घराबाहेर पडताना दिसत आहेत. यामुळेच आता निर्बंध अजून कठोर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. “पोलीसांना संयमाने काम करण्याच्या सूचना आहेत. पण त्यांना कडक पावले उचलण्याची वेळ येऊ देऊ नका. नागरिकांनी नियमांचे पालन करा आणि पोलिसांना सहकार्य करा. आपल्याकडे मर्यादित पोलीस फोर्स आहेत. रात्रंदिवस पोलीस काम करत आहेत. असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी नागरिकांना दिला आहे. तसेच ,माझे जनतेला आवाहन आहे की, तुमच्याकडून जी मदत असेल ती पोलिसांना द्या. पाणी, चहा, शक्य झाले तर काही खायला द्या. पोलिसांकडे डब्बे आहेत, पण सामाजिक भावनेच्या जाणिवेतून तुम्ही त्यांना पाठबळ द्या.” असे आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले.

तसेच , मुंबई पोलिसांनी गुरुवारी (15 एप्रिल) एका मास्क न घालणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मास्क घालण्यास सांगितल्यावर त्याने ट्रॅफिक पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. ही घटना मुलुंड मध्ये काल सकाळी 11.30 च्या सुमारास घडली आहे. त्यानंतर या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 16, 2021, 8:23 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *