चेंबुर, विक्रोळी येथील मृतांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई :मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या दोन भूस्खलनांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 11 जणांचा चेंबूर भागात तर 3 जणांचा मृत्यू विक्रोळी येथे झाला. 16 लोकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाच घरे कोसळली आहेत. दोन घरांचा ढिगारा काढण्यात आला असून तीन घरांचा मलबा काढणे सुरु आहे. घटनास्थळी उपस्थित एनडीआरएफ टीमचे बचाव कार्य सुरू आहे. पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत.
#UPDATE | Five bodies have been recovered and 5-6 more people are feared trapped in the debris of the building that collapsed in Mumbai's Vikhroli, says Prashant Kadam, DCP (Zone 7) pic.twitter.com/RoXopyL1WR
— ANI (@ANI) July 18, 2021
Rs 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to wall collapses in Mumbai. Rs 50,000 would be given to those injured: PMO
19 people have lost their lives in two incidents of wall & building collapse in Mumbai, Maharashtra
— ANI (@ANI) July 18, 2021
दरम्यान, चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा राज्याने केली. राज्या आणि केंद्र सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मदत जाहीर केली.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 18, 2021, 12:50 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY