संगमनेरमध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, दगडफेक करत पोलीस चौकीसह पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड
संगमनेर : संगमनेर शहरात जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दिल्ली नाका परिसरात गुरुवारी (6 मे) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास काही लोकांनी गर्दी केली होती. संचारबंदी असल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी यावेळी गर्दी केल्याबद्दल जाब विचारल्याने संतप्त जमावाने त्यांच्यावर थेट हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस चौकीसह पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. या हल्ल्याचे आणि गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओमध्ये जमाव पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही तर पोलीस कर्मचारी जीव वाचवून धावत असताना त्याचा पाठलाग करताना जमाव दिसत आहेत.हल्ल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी जमावाला तेथून हटवण्यात आलं.या प्रकरणी सहा जणांसह अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान , देशभरात करोना प्रभावित राज्यात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात करोनाचं संकट वाढत असल्याने निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांनी तर कडक लॉकडाउन लावला आहे. मात्र अद्यापही नियमांचं उल्लंघन होत असल्याने पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. दरम्यान काही ठिकाणी कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकतंच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये गर्दी जमा केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
संगमनेरमध्ये गर्दी केल्याचा जाब विचारल्याने जमावाकडून पोलिसाला मारहाण#Maharashtra #Ahmednagar #Sangamner #MaharashtraPolice #CoronaVirus #LockdownIndia pic.twitter.com/Md1TfNyG3P
— Kaaltarang News Marathi (@kaaltarangnews) May 7, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 7, 2021, 3:00 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY