Breaking News

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी समितीने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा – उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 23, 2021 3:44 pm
|

मुंबई : कोरोनाचा पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्क संदर्भात विद्यार्थी,पालक संघटनाकडून शासनाकडे निवेदन प्राप्त झाली आहेत. यासंदर्भात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी समितीने प्राप्त निवेदनावर अभ्यास करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा आशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या.

आज मंत्रालयात महाराष्ट्र विना अनुदानीत खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन ) अधिनियम -2015 नुसार गठीत केलेल्या समितीची पहिली बैठक आज झाली.

बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधिश विजय लखीचंद आचलिया, राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी, समितीचे सदस्य सनदी लेखापाल मनोज चांडक, परिव्यय लेखापाल रत्नाकर फडतरे, व्यवसायिक शिक्षण तज्ज्ञ धर्मेंद्र मिश्रा, संबंधित अधिकारी उपस्थित होते.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 23, 2021, 3:44 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *