आज डॉक्टर दिनाच्या दिवशीच डॉक्टर जोडप्याने मृत्यूला कवटाळे
पुणे : नॅशनल डॉक्टर डे’च्या दिवशीच पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. आज सकाळी हा सदरील प्रकार उघडकीस आल्यानंतर वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निखिल दत्तात्रय शेंडकर (वय 27) आणि पत्नी अंकिता निखिल शेंडकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता आणि निखिल हे दोघेही आझाद नगर इथं राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. अंकिता यांची क्लिनिक आझाद नगर येथील गल्ली नंबर २ या ठिकाणी आहे. तर, निखिल अन्य ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. काल रात्री घरी परतत असताना दोघांमध्ये फोनवर शाब्दिक वाद झाला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास निखिल घरी पोहोचले तेव्हा अंकिता घरातील बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्या. डॉक्टर अंकिता यांनी गळफास घेतल्याची माहिती वानवडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर अंकिता यांचा मृतदेह त्यांच्या ऊरुळीकांचन येथील माहेरी नेण्यात आला. पत्नीनं आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यानं डॉ. निखिल यांनी बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरामध्ये पंख्याला गळफास लावून घेतला. याची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टर निखिल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या दोघांनी आत्महत्या का केली हे समजू शकलं नाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 1, 2021, 3:49 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY