Breaking News

मुख्यमंत्र्यांनी सरनाईकांबद्दल निर्णय घेतलाय, लवकरच बातमी कळेल’, संजय राऊतांचे सूचक विधान

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 26, 2021 8:55 pm
|

शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि युतीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या. दरम्यान आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रताप सरनाईकांविषयी भाष्य केले आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्राविषयीही महत्त्वाचे भाष्य केले आहे. यासोबतच प्रताप सरनाईक आजन्म शिवसेनेत राहतील आणि त्यांच्याविषयी लवकरच बातमी कळेल असे सूचक विधान राऊतांनी केले आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवास्थानी भेट घेतली. जवळपास दोन तास यांच्यात बैठक झाली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री आहेत. मात्र, आज माझी चर्चा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. संघटनात्मक काम देखील महत्त्वाचे आहे. भविष्यात पक्ष मजबूत असेल, तर सरकार जास्त काळ टिकेल आणि मुख्यमंत्री देखील आमचाच राहिल. त्यासाठी पक्षसंघटेचे काम करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सरकार विषयीही चर्चा झाली.’ असेही राऊत म्हणाले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 26, 2021, 8:55 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *