Breaking News

‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है’, अमृता फडणवीसांचं नवं ट्विट; ठाकरे सरकारवर निशाणा!

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 12, 2021 2:11 pm
|

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या ट्विटमुळे चर्चेत येत आहेत. यावेळी देखील त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी ट्विटसोबत त्यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर केक लावण्यात आला आहे. या फोटोला अमृता यांनी ‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है’, असं कॅप्शन दिलं आहे

खरंतर अमृता फडणवीस यांचा काल (9 एप्रिल) वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्ताने त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिला. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर सर्वांचे आभार मानले आहेत. अमृता यांनी त्यांच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केल्याची शक्यता आहे. कारण त्यांनी सेलिब्रेशनसी संबंधित फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी केकचे ठिपके ठेवलेले दिसत आहेत. हा फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही अकाउंटवर शेअर केला आहे .


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 12, 2021, 2:11 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *