MPSCची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्निलची थक्क करणारी सुसाईड नोट, आईला अश्रू अनावर , म्हणाली …
पुणेः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळं आणि आर्थिक परिस्थितीमुळं तरुणानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या तरुणाच्या आत्महत्येमुळं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील सुनील लोणकर (वय २४, रा. फुरसुंगी) याने राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्नील याच्या आत्महत्येने खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आले. स्वप्नीलच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. स्वप्नीलच्या कुटुबीयांनी माध्यमांसमोर आक्रोश व्यक्त केला असून सरकारला जबाबदार धरलं आहे.
स्वप्नीलच्या आई-वडिलांनी आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलं. स्वप्नीलचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक कष्ट सोसले होते. स्वप्नील त्यांच्या आई-वडिलांच्या कष्ट्वाचे चिज करत होता. तो एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. स्वप्नीलविषयी बोलताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. ‘आज एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती तर मंत्र्याला जाग आली असती का नाही? तसंच दुसऱ्यांच्या आई-वडिलांचाही विचार करा. त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल. स्वप्नील हुशार होता, त्यामुळे आम्ही त्याला शिकवलं. तो परीक्षा पासही झाला. पण, मुलाखत होत नसल्याने तो आत्महत्येस प्रवृत्त झाला. माझा तळतळाट आहे की एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याशिवाय सरकारला कळणार नाही की मुलगा जाण्याचं दु:ख काय असतं, असं म्हणत स्वप्नीलच्या आईने आक्रोश व्यक्त केला.
आत्महत्येपूर्वी स्वप्नील लिहिलेलं शेवटचं पत्र..
MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं.
मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता.नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले…. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 4, 2021, 2:16 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY