फडणवीसांचा केलेला कायदा जर ‘फुलप्रुफ’ असता तर तो सर्वोच्च न्यायालयात टीकला असता,: उद्धव ठाकरेंचा पलटवार
मुंबईः मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना निवदेन सादर केलं.काही दिवस अगोदर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज हे भेट घेण्यात आली. तसेच, आता लवकरच यासाठी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली जाणार आहे. त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने केलेले प्रयत्न सविस्तरपणे मांडले आहेत. राज्यपालांना निवेदन सादर केल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली.
मराठा आरक्षण प्रकरणी आम्ही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या भावना पत्राद्वारे राष्ट्रपतींना पोहोचवल्या आहेत. केवळ राष्ट्रपतीच नव्हे तर यापुढे वेळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार आहोत, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची पूर्वनियोजीत वेळेनुसार आज (11 मे 2021) सायंकाळी पाचच्या सुमारास राजभवन येथे भेट घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील उपस्थित होते. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्र सरकारने या आधी केलेला मराठा आरक्षणाचा कायदा जर ‘फुलप्रुफ’ असता तर तो सर्वोच्च न्यायालयात टीकला असता, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगाला. दरम्यान, मराठा समाज हा अत्यंत समजदार आणि सोशिक आहे. त्यामुळे या समाजाने सरकारच्या भावना समजून घेतल्या आहेत. या समाजाचे आरक्षण टीकावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात यश आले नाही. परंतू, या समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. सर्वोच न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा रद्द ठरवला. त्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न सर्वांच्याच समोर उभा ठाकला आहे. या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी संभाव्य पर्यायांचा विचार करुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे कालच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आज राजभवन येथे ही भेट पार पडली.

बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 11, 2021, 6:40 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY