सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना दिलासा, केंद्र सरकारला दिले आदेश
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने गेल्या दोन दिवसांत कोरोनासंदर्भात दोन मोठे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी कोरोनात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी भरपाईची रक्कम निश्चित करा असे आदेश बुधवारी सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आहेत. तसेच NDMA ला गाइडलाइन तयार करण्यास सांगितले आहे.
सुप्रीम कोर्टाने तीन ठळक मुद्दे केंद्राच्या निदर्शनास आणून दिले आहेत. त्यामध्ये पहिला म्हणजे, कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर जारी केल्या जाणाऱ्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी गाइडलाइन जारी करावे. दुसरा मुद्दा म्हणजे, वित्त आयोगाला जशा स्वरुपाच्या शिफारसी पाठवण्यातत आल्या आहेत, त्या आधारे केंद्राने लवकरात लवकर अशा व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी / वारसांसाठी एक विमा योजना सुरू करावी. तिसरा मुद्दा असा की NDMA ने मदतीचे किमान निकष लक्षात घेऊन कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसाठी 6 आठवड्यांच्या आत गाइडलाइन जारी कराव्या.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 30, 2021, 1:24 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY