चीनचे मोठे यश, लाल ग्रहावर उतरवले अवकाशयान ,अमेरिकेनंतर चीन ठरला विक्रम करणारा दुसरा देश
बीजिंग: संपूर्ण जगाला कोरोनाने हाहाकार माजवला असताना चीनची महत्वाकांक्षी मंगळ मोहीम आज यशस्वी झाली आहे . चीनने मंगळ ग्रहावर अवकाशयान यशस्वीरित्या उतरवले आहे.चीनच्या या अवकाशयानाचे नाव ताईन्वेन-1 (Tianwen-1 ) असे आहे. यासह अमेरिकेनंतर चीन हा विक्रम करणारा दुसरा देश ठरला आहे. चीनच्या झुरोंग रोव्हरचा सात महिनाचा अंतराळ प्रवास, तीन महिन्यांपर्यंत ऑर्बिट ची परिक्रमा आणि शेवटच्या सात मिनिटांच्या परिक्रमानंतर, शनिवारी सकाळी मंगळच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरला. चीनच्या नॅशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन (सीएनएसए) ने शनिवारी सकाळी याची माहितीए दिली आहे. . सीएनएसएने वृत्त दिले की देशातील पहिला रोव्हर झुरोंग यशस्वीपणे मंगळ ग्रहावर दाखल झाला आहे.
China's 1st Mars rover 'Zhurong' lands on the Red Planet https://t.co/Zl2pHV0upB pic.twitter.com/n1epfUOUqh
— Live Science (@LiveScience) May 15, 2021
चीनच्या नॅशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन म्हटले आहे की 23 जुलै 2020 रोजी ताईन्वेन-1 ला लाँच करण्यात आले होते, ज्यामध्ये एक ऑर्बिटर, एक लँडर आणि रोव्हर झुरोंग यांचा समावेश होता. झुरोंग हा रोव्हर मंगळावर उतरलेल्या ठिकाणाचं सर्वेक्षण करेल आणि माहिती चीनच्या अवकाश संशोधन केंद्राकडे पाठवेल. झुरोंग रोव्हरवर टोपोग्राफी कॅमेरादेखील बसवण्यात आलेला आहे. रोव्हर मंगळ ग्रहावरील माती आणि वातावरणाचा अभ्यास करेल. याशिवाय मंगळग्रहावरील प्राचीन जीवन, पाणी आणि बर्फ याबाबतही अभ्यास केला जाणार आहे.

चीनने पाठवलेल्या अवकाशयानाला एका कवितेवरुन नाव देण्यात आले आहे. ताईन्वेन हे पाच टन वजन असलेले अवकाशयाने चिनी बेट हैनान येथून गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रक्षेपित करण्यात आले होते. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर फेब्रुवारीमध्ये अवकाशयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. झुरोग रोव्हर यशस्वीरित्या कार्यरत झाल्यास चीन हा पहिल्याच मोहिमेत यशस्वी ठरणारा देश ठरेल.
video
An uncrewed Chinese spacecraft successfully landed on the surface of Mars on Saturday, state news agency Xinhua reported, making China the second space-faring nation after the United States to land on the Red Planet. https://t.co/owQHGVP82m
— Reuters Science News (@ReutersScience) May 15, 2021

बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 15, 2021, 5:31 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY