Breaking News

Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाने जिंकले कांस्य, पंतप्रधानांनी फोनवरून साधला संवाद, राष्ट्रपती-गृहमंत्री म्हणाले..

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 5, 2021 2:58 pm
|

नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची आपली 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जर्मनीविरुद्धचा कांस्यपदक सामना जिंकला आहे. या ऐतिहासिक घटनेनंतर टीम इंडियावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोंदीनीही ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “ऐतिहासिक. असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कायम जिवंत राहील. कांस्य पदक जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या कामगिरीने त्यांनी संपूर्ण राष्ट्राची, विशेषत: आपल्या तरुणांच्या कल्पनाशक्तीला प्रेरणा दिली आहे. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे.”असे म्हटले आहे. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाचे कॅप्टन आणि प्रशिक्षकांजवळ फोनवरून संवाद साधला आहे. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ट्वीट केले की, “41 वर्षांनंतर हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. संघाने अपवादात्मक कौशल्य, लवचिकता आणि जिंकण्याची जिद्द दाखवली. हा ऐतिहासिक विजय हॉकीमध्ये नव्या युगाची सुरुवात करेल आणि तरुणांना खेळात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “टीम इंडियाचे अभिनंदन. आमच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले, हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाचा क्षण आहे. तुम्ही संपूर्ण देशाला गौरवान्वित केले आहे.”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले की, “भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. हा एक मोठा क्षण आहे. तुमच्या कर्तृत्वाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे..


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 5, 2021, 2:58 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *