Breaking News

Sana Ramchand | पाकिस्तानातील पहिली हिंदू तरुणी, असिस्टंट कमिश्नर बनली, सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 8, 2021 7:21 pm
|

लाहोर : पाकिस्तानमध्ये प्रथमच एक हिंदू मुलगी सहाय्यक आयुक्त बनली आहे. सना रामचंद असे त्याचे नाव आहे. हे स्थान मिळविण्यासाठी तीने सेंट्रल सुपीरियर सर्व्हिस (सीएसएस) परिक्षा पास केली. यानंतर तीची निवड पाकिस्तान प्रशासकीय सेवेत (पीएएस) झाली. ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी प्रशासकीय परीक्षा आहे. सना देखील पेशाने एमबीबीएस डॉक्टर आहे.

सना सिंध प्रांताच्या शिकारपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तीने सिंध प्रांताच्या चांदका मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले.सीएसएस लेखी परीक्षेत 18,553 उमेदवार हजर होते. त्यापैकी 221 उत्तीर्ण झाले. सना स्थानिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, ‘मी खूप आनंदी आहे. मला लहानपणापासूनच यश आवडते आणि मला त्याची सवय झाली आहे. मी माझ्या शाळा, महाविद्यालय आणि एफसीपीएस परीक्षेतही अव्वल स्थान मिळवले आहे.’

सनाने कोणत्याही क्लास शिवाय हे यश मिळवलं आहे. ती कराची इथे वास्तव्यास आहे. तिने फक्त मुलाखतीसाठी शिकवणी लावली होती, असंदेखील तिने सांगितलं. तिला मिळालेल्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील हिंदू समाजही तिचं कौतुक करत आहे. ज्यात पाकिस्तानच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचाही समावेश आहे. त्यांच्या यशाबद्दल पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते फरहतुल्ला बाबर यांनीही डॉ सना रामचंद्र यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट केले की ‘डॉ. सना रामचंद्र यांनी पाकिस्तानी हिंदू समाजाला अभिमान वाटला आहे आणि संपूर्ण राष्ट्राचा त्यांना अभिमान आहे. कारण पाकिस्तानात खूप कमी हिंदू महिलांना यश संपादित करण्यात यश आलेलं आहे. सनाचं सोशल मीडियावर देखील कौतुक केलं जात आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 8, 2021, 7:21 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *