Breaking News

अनिल देशमुखांना दणका, 4 कोटी नव्हे , तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता EDकडून जप्त !

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 17, 2021 7:20 pm
|

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती काल (16 जुलै) समोर आली होती. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने देशमुखांच्या जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ही तब्बल 350 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ‘टीव्ही 9’ने दिलेल्या वृत्तानुसार 100 कोटी रुपये खंडणीच्या आरोपांवरून अनिल देशमुखांची चौकशी सध्या सुरू आहे. काल ईडीने त्यांच्या दोन मालमत्ता जप्त केल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त मालमत्तांची किंमत 4 कोटी 20 लाख असल्याचं म्हटलं होतं. परंतु ही केवळ खरेदीची किंमत असून त्याचे बाजारमूल्य तब्बल 350 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचं सांगण्यात येत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख यांना तीन वेळा समन्स बजावलेले आहे. त्यांच्या मुलाला – ऋषिकेश देशमुख यांनाही एकदा समन्स बजावण्यात आले होते. तथापि, देशमुख पितापुत्रांनी चौकशीसाठी हजर न राहता ती टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावले. त्यांनीही हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ईडीला सादर केली आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 17, 2021, 7:20 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *