Breaking News

मी बलिदान देण्यासाठी तयार ; म्यानमारमधील सौंदर्यवती लोकशाही वाचविण्यासाठी रायफलसह उतरली मैदानात

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 17, 2021 5:35 pm
|

म्यानमार : म्यानमारमधील लोकशाही वाचविण्यासाठी एका 32 वर्षीय सौंदर्यवतीनं हातात रायफल घेतली आहे. लष्कराविरुध्दच्या सशस्त्र लढ्यात तीने बंड पुकारला आहे. सैन्याच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात आता ती स्थानिकांसोबत सहभागी झाली आहे. रायफलसोबत आपले फोटे तिने सोशल मीडियात पोस्ट केले आहे.

म्यानमारमध्ये लोकशाहीवादी राजवट उलथवून लष्कराने हाती सत्ता घेतल्यानंतर 100 दिवसांनी 32 वर्षीय सौंदर्यवतीने बंड पुकारला आहे. आधुनिक शस्त्रांसोबत ती सैन्याच्या विरोधात उभा राहिली आहे. लष्कराविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आता ती स्थानिकांसोबत सहभागी झाली आहे.तारा टेट असे या सौंदर्यवतीचे नाव आहे. 2013 मध्ये तार टेटने मिस गह्यँड आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत म्यानमारचे प्रतिनिधित्व केले होते. तार टेट टेट हिने आठ वर्षांपूर्वी 60 प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सौंदर्यवतीचा मुकुट पटकावला होता.

तारा टेट यांनी लिहिलं, की क्रांती एखाद्या सफरचंदाप्रमाणे नाही की, तयार होताच स्वत:हून खाली पडेल. आपल्याला स्वत: लढावे लागेल आणि ही लढाई जिंकावी लागेल. पुन्हा एकदा लढण्याची वेळ आली आहे. तुम्ही स्वत:जवळ एक शस्त्र, लेखणी किंवा कीबोर्ड ठेवा नाही तर लोकशाहीच्या समर्थनात उभे राहून आंदोलनासाठी पैसे दान करा. प्रत्येकाने विजयी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी संघर्ष कायम ठेवेल.मी स्वतःचा जीवही बलिदान देण्यासाठी तयार आहे. असे तार टेट टेटने पोस्टमध्ये लिहिले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 17, 2021, 5:35 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *