Breaking News

कोरोना व्हायरस : उद्यापासून 15 दिवस संचारबंदी लागू,वाचा उद्धव ठाकरे यांच्या लाइव्हमधील महत्त्वाचे मुद्दे

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 13, 2021 9:20 pm
|

मुंबई : राज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संचारबंदी, लॉकडाऊन यांचे काटेकोरपणे पालन होत आहे. मात्र तरी कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच राज्यात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनबाबत (Lockdowon) चर्चा सुरु आहे. आता महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मंगळवार, 13 एप्रिल 2021 रोजी, रात्री 8.30 वाजता राज्याला संबोधित केले . दरम्यान ,कोरोनाची ही साखळी मोडण्यासाठी मुख्मंत्र्यांनी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. उद्या रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहणार मात्र त्या केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी चालू राहणार.

उद्धव ठाकरे यांच्या लाइव्हमधील महत्त्वाचे मुद्दे

उद्या संध्याकाळ पासून ब्रेक दि चेन साठी राज्यात १४४ कलम लागू करण्यात आला आहे.

पुढील १५ दिवस संचारबंदी, अनावश्यक फिरणे टाळले पाहिजे.

अनावश्यक ये-जा थांबवायची आहे. हॉटेल रेस्टॉरंट बंधन कायम. रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना पॅकिंगसाठी परवानगी

बांधकाम आणि इतर उद्योगातील कामगारांची व्यवस्था कामाच्या ठिकाणी राहण्याची सुविधा करा.

रुग्णालय, विमा, वैद्यकीय सेवा डिलर, लस उत्पादक, मास्क जंतू नाशक उत्पादक, कृषी , हवाई वाहतूक, विविध देशांची राजनैतिक कार्यालये. पावसाळेपूर्वीचे कामे देणारे, ई-कॉमर्स. अधिस्वीकृत पत्रकार, डेटा सेंटर सुरू राहणार

लोकल आणि बसेस सुरू राहणार, अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी ही सेवा सुरू राहणार

सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू

दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज

एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार

कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा

उद्या रात्री आठ वाजेपासून राज्यात निर्बंध कठोरपणे लागू करणार आहे. यात पंढरपूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीपर्यंत लागू होणार नाही.

निवृत्त डॉक्टरांनी महाराष्ट्रातील या परिस्थितीशी लढण्यासाठी सरकारच्या मदतीसाठी या सर्व उपाय योजना करत आहोत. पण ही उपाय योजना एकतर्फी आहे. यासाठी डॉक्टरांची गरज आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 13, 2021, 9:20 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *