Breaking News

काहीतरी गौडबंगाल, पोलिसांनी डोकानियांना ताब्यात घेताच भाजप का घाबरला,? ; नवाब मलिकांचा सवाल

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 18, 2021 7:59 pm
|

मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच राज्यातील राजकारण चांगलच पेटलं आहे. दरम्यान, दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन शनिवार दुपारपासून केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरू आहे. या लढाईचा एक भाग पार्ले येथील पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री रंगला. ब्रुक फर्मा(Bruck Pharma) कंपनीकडे रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर विले पार्ले पोलिसांनी ब्रुक फार्माचे संचालक राजेश डोकानिया यांना दहा पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती मिळताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी पोलिसांनी कारवाईबद्दल जाब विचारत खरडपट्टी काढली. शाब्दिक वादानंतर भाजपचे नेते आणि पोलीस अधिकारी बीकेसीतील पोलीस उपायुक्त कार्यालयात पोहोचले. पोलीस कार्यालयात देवेंद्र फडणवीस तासभर ठाण मांडून बसले होते . यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निशाणा साधत म्हणाले राज्य सरकारला साठा का उपलब्ध केला जात नाहीये ?’ असे सवाल उपस्थित करत मलिक यांनी यात काहीतरी गौडबंगाल असल्याची शंका व्यक्त केली आहे.

दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला होता. यामुळे काल दिवसभर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी रंगल्यानंतर आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच 50 हजार रेमडेसीवीर वाटणार असं ट्विट भाजप नते करतात, मात्र हा साठा सरकारला का देत नाहीत ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला. रेमडेसीवीर सरकारला मिळू नये अशी भूमिका भाजप घेत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. भाजपचे प्रमुख नेते पोलीस ठाण्यात का गेले ? हे स्पष्टीकरण द्यावे. साठा या लोकांकडे असल्याचे ते म्हणाले.मात्र, दरेकर यांनी दमणला जाऊन भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात भाजपतर्फे ५० हजार इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल असं सांगण्यात आलं. मग भाजपचे आणि ब्रुक फार्मा या कंपनीचे काय संबंध आहेत हे भाजपने स्पष्ट करायला हवं.
तसेच ‘केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यानंतर देशांतर्गत रेमडेसिविरचा साठा पुरवण्यासाठी सात कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. ब्रुक फार्मा कंपनीकडे रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. म्हणून या कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. योग्य कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले असून पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यास यावे लागेल असं सांगण्यात आलं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे राज्याचे दोन विरोधी पक्षनेते आणि भाजपचे दोन आमदार हे डोकानिया यांच्या वकिलीसाठी पोलीस ठाण्यात का गेले ?’ असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 18, 2021, 7:59 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *