त्या’ मुलाला वाचवणारा पॉईट मॅन मयूर शेळके याचे पीयूष गोयल यांनी केलं कौतुक तर स्वप्नील जोशी म्हणाला (video)
वांगणी : रेल्वेच्या पॉइंटमने (Railway Pointsman) चिमुकल्याचे प्राण वाचवण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाला आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) वांगणी( Vangani Railway Station)स्थानकावरील ही घटना आहे. पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. ‘शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उद्यान एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी मी कामावर होतो. त्यावेळी एक अंध महिला तिच्या मुलीला घेऊन फलाटावरून चालत होती. तिच्या नकळत तो मुलगा फलाटावरून खाली पडला. त्यावेळी समोरून एक्स्प्रेस येत होती. मुलाला वाचवणं गरजेचं आहे असा निर्धार मी मनाशी केला आणि जीवाची बाजी लावली. त्यानंतर मी लगेचच मुलाच्या दिशेनं धावत सुटलो,’ असं शेळके यांनी सांगितलं. रेल्वेचे पॉइंटमन मयूर शेळके यांनी दाखवलेल्या हिमतीचा अभिमान वाटत असल्याचं ट्विट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे.
Very proud of Mayur Shelke, Railwayman from the Vangani Railway Station in Mumbai who has done an exceptionally courageous act, risked his own life & saved a child's life. pic.twitter.com/0lsHkt4v7M
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 19, 2021
रेल्वेमंत्री पियूष गोयल म्हणाले. “आज रेल्वेमॅन मयूर शेळ यांच्याशी संवाद साधून त्यांच्या धाडसाचं आणि त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. संपूर्ण रेल्वे कुटुंबाला त्यांचा अभिमान आहे. एका लहान मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात टाकला. मला रेल्वेकडून खुप काही मिळालं आहे. मी केवळ माझी जबाबदारी पार पाडली असं त्यांनी सांगितलं,” अशी माहिती पीयूष गोयल यांनी दिली. “त्यांच्या या शौर्याची आणि कामाची कोणत्याही पुरस्काराशी किंवा पैशाशी तुलना केली जाऊ शकत नाही. परंतु आपलं कर्तव्य पार पाडणं आणि आपल्या कामातून मानवतेबद्दल प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचा नक्कीच गौरव केला जाईल,”
रेल्वेचे पॉइंटमन मयूर शेळके यांनी दाखवलेल्या हिमतीवर अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला हे अत्यंत कौतुकास्पद असून देव त्याचं भलं करो !
अत्यंत कौतुकास्पद !
देव त्याचं भलं करो !
— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) April 19, 2021
मध्य रेल्वेकडून सुद्धा शेळके यांना मुख्यालयात बोलवून टाळ्या वाजून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच, मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनीसुद्धा त्यांचे कौतुक केले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 19, 2021, 6:50 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY