ओबीसी राजकीय आरक्षणावरून कल्याण, भिवंडीतही आंदोलन
कल्याण/भिवंडी,: राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण नाकारल्याच्या मुद्द्यावरून भाजपातर्फे कल्याण-भिवंडीमध्येही चक्का जाम आंदोलन करण्यात आले. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजपातर्फे राज्यभरात ओबीसींच्या आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येणार होते. त्यानुसार कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी पूल, भिवंडी तालुक्यातील रांजणोली फाटा येथे आंदोलन झाले. या आंदोलनात आमदार महेश चौगुले, माजी आमदार नरेंद्र पवार, शहराध्यक्ष संतोष शेट्टी, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर, गुरुनाथ जाधव, श्रीधर पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ओबीसी आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला. मात्र, त्याचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी महाविकास आघाडीने टाळाटाळ केली. त्याचा फटका राज्यभरातील ओबीसी कार्यकर्त्यांना बसत आहे. महाविकास आघाडीच्या नाकर्त्या कारभारामुळे ओबीसी कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य संपविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप खासदार कपिल पाटील यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ओबीसींची वस्तूजन्य परिस्थितीचा अहवालही देण्यास सरकार अपयशी ठरले, असे कपिल पाटील यांनी नमूद केले. ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत भाजपाकडून आंदोलन सुरूच राहणार असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 26, 2021, 5:39 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY