Breaking News

देशात प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा तुटवडा जाणवला नसता

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 9, 2021 12:50 pm
|

सातारा देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. मात्र, राज्यात सध्या लसींचा तुटवडा जाणवत आहे. येत्या दोन-तीन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यावर उदयनराजे भोसले यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला जास्त दिले आणि कुठल्या राज्याला कमी दिले जाते हा वाद निर्माण करू नका. महाराष्ट्राला जास्त कशाला मिळाले पाहिजे. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या क्षमतेप्रमाणे लस दिली पाहिजे’. तसेच कोणत्या कालावधीत व्हायरस बाहेर येतो, कोणत्या कालावधीत झोपलेला असतो, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी. मात्र, प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज लसीचा तुटवडा जाणवला नसता आणि ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही ते म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले,”गो करोना गो करोना असे म्हणून करोना जाणार नाही. त्यामुळे शासनाने लावलेल्या निर्बंधांबाबत योग्य तो पुनर्विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यांनाही कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत. मात्र, आरोग्य महत्वाचे आहेच पण खाण्याचे काय? याचाही विचार सरकारने करावा. त्यामुळे सरकारने लोकहिताचे निर्णय घ्यावेत. जगाच्या पोटात या संसर्गाने भीतीचा गोळा निर्माण केला. या आजाराच्या नुसत्या भितीने लाखो लोक हृदयविकाराने गेले. त्यामुळे लोकांनी न भिता संसर्गाचा सामना करावा”, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांची उदयनराजे भोसले यांनी भेट घेतल्यानंतर त्यावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले होते. त्यावर देखील उदयनराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिलं. “शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी भेटलो. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. मात्र सध्या “राज्याच राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे”, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. राज्यातील घडामोडींचा, करोनाचा आणि राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनचा यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला!


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 9, 2021, 12:50 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *