खुर्ची मिळाली तरच काम करणार असं वक्तव्य कुणी केलं नव्हतं – जयंत पाटील
मुंबई : राज्यात भाजपची सत्ता आल्यास तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण नाही दिले तर मी राजकीय संन्यास घेईन अशी गर्जना महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली होती. ते ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी भाजपने पुकारलेल्या जेलभरो आंदोलनात बोलत होते. फडणवीसांच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात टीका टिप्पणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
जयंत पाटील म्हणाले , सत्ता आल्याशिवाय मी महाराष्ट्रासाठी काहीच करणार नाही, मला सत्ता मिळाली की मी सर्वकाही करेन, सत्ता मिळेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीही करणार नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले . खुर्ची मिळाली तरच काम करणार नाहीतर नाही असा जो फडणवीस यांचा हट्ट आहे हे योग्य नाही. असे वक्तव्य महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यांनी केलेले नाही, असं जयंत पाटील म्हणाले. , भाजपला सत्तेत येण्याची गरज नाही कारण राज्यातील जनतेने त्यांना नकार दिला आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. ओबीसी समाजाबद्दल भाजपला आज जो कळवळा निर्माण झाला आहे. मात्र यांच्यामुळे भुजबळसाहेबांना तुरुंगात खितपत पडून राहावे लागले. एकनाथ खडसेंसारखे ओबीसी नेते पक्षातून बाहेर काढले गेले. एकंदरीत भाजपमध्ये ओबीसी नेता राहणार नाही असा प्रयत्न भाजपकडून झाला. ओबीसी समाजाची चळवळच संपवण्याचं काम करण्यात आल्याचा गंभीर आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. दरम्यान, छगन भुजबळ यांनी भाजपकडे तोडगा काढण्याची विनंती केली आहे. पण फडणवीस काय म्हणतात मला सत्ता द्या, तीन महिन्यात प्रश्न सोडवतो. म्हणजे सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाही का?, असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 28, 2021, 4:46 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY