केंद्र सरकारने १२ कंपन्यांना परवानगी दिलेल्या निर्णयाची मला कल्पना नव्हती; नितीन गडकरींची प्रांजळ कबुली
नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लसीची मागणी वाढत असताना एका पेक्षा अधिक लस उत्पादकांना सरकारने परवानगी द्यावी, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका बैठकीत केली होती. प्रत्यक्षात त्यांची सूचना येण्यापूर्वीच केंद्र सरकारने १२ कंपन्यांना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मात्र, या बाबीची आपल्याला भाषणापूर्वी कल्पना नव्हती, असा खुलासा नितीन गडकरी यांनी प्रांजळ कबुली दिली आहे.
आज त्यांच्या भाषणाला २४ तास उलटून गेल्यानंतर गडकरी यांनी या सूचनांबाबत खुलासा केला आहे. मंत्री मनसुख मांडविया यांनी मला बैठकीनंतर सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यात १२ कंपन्यांच्या प्लँटसंबंधीचीही माहिती होती, पण गडकरींनी ती माहिती ऐकली नाही असे गडकरी यांनी स्पष्ट केले. कोरोना प्रतिबंधक लसीची मागणी वाढत असताना रसायन मंत्रालय योग्य दिशेने चालले आहे. मंत्र्यांचे आणि अधिकाराऱ्यांचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत, हे रेकॉर्डवर आणावेसे वाटले म्हणून आपण हा खुलासा करीत असल्याची कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 19, 2021, 4:06 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY