Breaking News

खासदार संभाजी छत्रपती राज्यातील पूरस्थितीवर आज संसदेत म्हणाले ,….

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 28, 2021 3:59 pm
|

कोल्हापूर: राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्यावर सर्वच यंत्रणा ठप्प होतात. कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे या शहरांतील जलनिस्सारण व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याचे दिसून येत आहे असा प्रश्न आज संसदेत खासदार संभाजी छत्रपती यांनी उपस्थित केला. यावर, केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटले, अतिवृष्टीमुळे येणाऱ्या पूराच्या पाण्याचे निस्सारण करण्याचा दृष्टीने आवश्यक ती व्यवस्था उभारण्यासाठी केंद्राच्या अमृत योजनेतून निधी दिला जातो. यामाध्यमातून स्थानिक शासन संस्थेने त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे आहेअसल्याचे त्याने म्हटले आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये अनेक भागात पूर आला आहे. या भागाची पाहणी करण्यासाठी संभाजी छत्रपती आले होते. कोल्हापूर शहर व जिल्ह्यात पूरग्रस्त भागांना भेटी देऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटना घडल्या , तसेच महापूर आलेल्या भागांची पाहणी त्यांनी केली.त्यावेळी ते म्हणाले ,कोल्हापूरचं नियोजन झालं पाहिजे. नाही तर दरवर्षी पूर येतच राहील. नुकसान होतच राहील. आता असं चालणार नाही. धरणातील गाळ काढला पाहिजे. शहर वाढत आहे. वस्ती वाढत आहे. नद्यांमध्ये गाळ आहे. त्यावर पुन्हा नियोजन करण्याची गरज आहे. केवळ पावसामुळे हे परिणाम होत आहेत. धरणाचं पाणी सोडलं असतं तर किती अनर्थ झाला असता, असंही ते म्हणाले होते .


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 28, 2021, 3:59 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *