Breaking News

Coronavirus: लॉकडाऊन निषेधार्थ खासदार छत्रपती उदयनराजे कटोरा घेऊन आंब्याच्या झाडाखाली बसले, अन्…

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 10, 2021 4:25 pm
|

सातारा : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) सुरू आहे. यादरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन (Maharashtra break the chain) अंतर्गत अत्यंत कडक निर्बंध लावले जात आहेत. राज्यात काही ठिकाणी याला विरोधही होताना दिसत आहेत. साताऱ्यात तर स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन केलं आहे. साताऱ्यातील पोवई नाका येथे उदयनराजेंनी चक्क कटोरा घेऊन रस्त्यावर भीक मांगो आंदोलन केले. यावेळी विविध विषयावरून उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर जोरदार घणाघात केला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शासनाच्या लॉकडाउन विरोधात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून कटोरा ठेवून भीक मागो आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी उदयनराजे यांनी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्य सरकारवर टीका केली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला साताऱ्यात आज सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी लॉकडाउनला जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसुम दिसत होती. मात्र, या लॉकडाउनला साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. येथील पोवई नाक्यावर त्यांनी हातात थाळी घेऊन प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाउनचा निषेध केला. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या तुघलक्या कारभाराचाही निषेध व्यक्त केला.या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

यावेळी भीक मांगो आंदोलनात जमा केलेले ४५० रुपये घेऊन खासदार उदयनराजेंनी चालत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. राज्य सरकारनं लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच मी दुकानदार अथवा व्यापाऱ्यांच्या बाजूने बोलत नाही तर सर्वसामान्यांच्या बाजूने बोलतोय. तुम्ही सगळं बंद करून उपासमारीची वेळ आणली आहे. आज जी परिस्थिती आली आहे त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, तुमचे काळे कारनामे लपवण्यासाठीच लॉकडाऊन केलाय अशी टीकाही खासदार उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर केली. एकीकडे खासदार उदयनराजे सरकारविरोधात आंदोलन करून रस्त्यावर कटोरा घेऊन दिसले तर दुसरीकडे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील लॉकडाऊनमधील वेळ सत्कारणी लावत शेतात काम करत असल्याचा फोटो व्हायरल झाला.

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॅाकडाऊन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा. अन्यथा जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 10, 2021, 4:25 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *