Breaking News

‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसीत करण्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागासोबत करार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 21, 2021 5:40 pm
|

मुंबई,: महाराष्ट्र आणि अमेरिकेच्या कृषि विभागात परस्पर तांत्रिक सहकार्यासाठी हा सामंजस्य करार झाला. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्यात मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ( स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून त्यामाध्यमातून प्रमुख पिकांच्या स्पर्धाक्षम आणि सर्व समावेशक मूल्यसाखळी विकसीत करण्यात येत आहेत. या कराराच्या माध्यमातून राज्याच्या कृषि विभागाची क्षमताबांधणी करण्यात येईल. कृषि पणन, बाज़ार माहिती आदी बाबींमध्ये क्षमताबांधणीसाठी काम केले जाईल, शासनाचा कृषी विभाग आणि अमेरिकेचा कृषि विभाग यांच्यात राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेविड रांझ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

कृषिमंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले कि, या कराराच्या माध्यमातून कृषि क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी धोरण राबविण्यासाठी टाकण्यात आलेले महत्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार राज्यात “विकेल ते पिकेल” अभियानाच्या माध्यमातून बाजाराभिमुख पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतानाच त्या शेतमालासाठी निश्चित अशी बाजार व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.

अमेरिकेचे वाणिज्य दूत डेविड रांझ म्हणाले कि, आज करण्यात आलेला सामंजस्य करार हा महत्वाकांक्षी असून अमेरिकेच्या कृषि विभागाचा भारतातील राज्य सरकार सोबतचा पहिला करार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामाध्यमातून द्विपक्षीय क्षमताबांधणी करण्यात येईल. अमेरिकेचे कृषि क्षेत्रात मोलाचे योगदान असून जागतिक अन्नसुरक्षा आणि कापूस तसेच इंधनाची वाढती मागणी या क्षेत्रात संयुक्तरित्या काम करण्यास फार मोठा वाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 21, 2021, 5:40 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *