मुख्यमंत्र्यांच्या ‘कोरोना’विरोधी लढ्याला लतादीदींची साथ; केली लाखोंची मदत
मुंबई : गानकोकिळा अशी ख्याती असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला सात लाख रुपयांची मदत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कोरोना संकट हाताळण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून सात लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड १९ यासाठी दिलेल्या देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून शंभर टक्के सूट देण्यात येते.
भारतरत्न @mangeshkarlata यांनी #मुख्यमंत्रीसहायतानिधी #COVID_19 साठी ७ लाख रुपयांची दिली मदत. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मानले आभार. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन. pic.twitter.com/zOT9XhKNw2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 1, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 1, 2021, 2:15 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY