Breaking News

ब्लॅक आणि व्हाइटनंतर यलो फंगसचा धोका, जाणून घ्या लक्षणेआणि त्याचा धोका ?

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 25, 2021 7:02 pm
|

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान काळी बुरशी (Black Fungus) आणि पांढरी बुरशी (White Fungus)या आजारांनीही अडचणीत भर घातली आहे. आता पिवळ्या बुरशीचाही (Yellow Fungus) रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. यलो फंगसचे हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधून समोर आले आहे. दरम्यान, देशात ऑक्सिजन शॉर्टेजमुळे कोरोना रुग्णांना उद्योगांसाठी वापरली जाणारी ऑक्सिजन दिल्यामुळे फंगस इन्फेक्शन वाढल्याचे म्हटले जात आहे. काळ्या-पांढर्‍या बुरशीपेक्षा पिवळ्या बुरशीचे प्रमाण जास्त धोकादायक आहे, असा दावा येथील तज्ज्ञांनी केला आहे.

जाणून घ्या ब्लॅक आणि व्हाइट फंगसशिवाय इतरही फंगल इन्फेक्शन असतात का ? यांची कारणे कोणती आहेत ? यातील कोणता जास्त धोकादायक असतो ? यांची लक्षणे काय आहेत? आणि याच्यापासून कसे वाचावे…?

पांढरी बुरशी रुग्णाच्या फुप्फुसावर परिणाम करते, तर काळी बुरशी मेंदूवर हल्ला चढवते. परंतु ही पिवळी बुरशी या दोन्हींपेक्षाही धोकादायक आहे. आजवर कोणत्याही माणसात अशा प्रकारची बुरशी आढळली नव्हती. तथापि, काही प्राण्यांमध्ये अशी बुरशी आढळत असते.

पिवळ्या बुरशीची लक्षणे कोणती?

पिवळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास नाक वाहणे, डोकेदुखी अशीच लक्षणे आहेत. परंतु ही बुरशी जखम भरू देत नाही. याचमुळे ही जास्त खतरनाक म्हटली जाते. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, गाझियाबादच्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्याकडे एका रुग्णात तिन्ही प्रकारची बुरशी आढळली. ही पिवळी बुरशी मी माझ्या 30 वर्षांच्या वैद्यकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच पाहिल्याचे ते म्हणाले.

पिवळी बुरशी किती धोकादायक?

डॉक्टरांच्या मते, आजपर्यंत कोणत्याही मनुष्यात पिवळी बुरशी आढळलेली नाही. या बुरशीला म्युकरसेप्टिकल्स नावाने ओळखले जाते. ही अद्याप मानवांमध्ये सापडलेली नव्हती. ही बुरशी नाकात जी जखम तयार करते, ती जेव्हा डॉक्टर स्वच्छ करतात, तेव्हा ती भरू देत नाही. त्यातून पस आणि रक्त वाहत राहते. याचमुळे ही आधीच दोन्ही बुरशींपेक्षा धोकादायक आहे.

ज्या रुग्णात पिवळी बुरशीचा प्रादुर्भाव आढळला आहे, त्यांच्या मुलाने सांगितले की, त्यांच्या वडिलांना दोन महिन्यांपासून कोरोना आहे. ते बरहे होत होते, परंतु काल अचानक नाक आणि डोळ्यात रक्त आल्यानंतर त्यांना येथे आणण्यात आले. तर गाझियाबादचे सीएमओ डॉ. नरेंद्र गुप्ता यांनी फोनवर म्हटले की, पिवळ्या बुरशीसारखा कोणताही रुग्ण आतापर्यंत आढळलेला नाही.

या फंगसचा कोरोना रुग्णांनाच जास्त धोका का ?

ज्या रुग्णांमध्ये आधीपासून कँसर, डायबिटीजसारखे आजार आहेत किंवा जे अनेक दिवसांपासून स्टेरॉइडचे सेवन करतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये फंगस होण्याची अधिक शक्यता असते.

फंगसपासून वाचण्यासाठी काय करावे ?

फंगल इन्फेक्शन स्वच्छतेशी संबंधित आहे. ब्लॅक फंगसपासून वाचण्यासाठी डॉक्टर डॉक्टर कंस्ट्रक्शन साइट किंवा धुळ असलेल्या परिसरापासून दूर राहण्यास सांगतात. याशिवाय, गार्डनिंग किंवा शेती करताना फुल स्लीव्स आणि ग्लव्ज, मास्क घालण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, अनेक दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांजवळ स्वच्छतेची काळजी घेतली जावी. रुग्णासाठी वापरले जाणारे वैद्यकीय उपकरण स्वच्छ असावे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 25, 2021, 7:02 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *