Breaking News

Kishori Pednekar: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 20, 2021 6:39 pm
|

मुंबई : मुंबईच्या महापौर (Mumbai mayor) किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आज परळच्या (parel) ग्लोबल रुग्णालयातून (global hospital) डिस्चार्ज देण्यात आला. ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, “ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे आहे. येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा केली जाते. मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते.” छातीत दुखू लागल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहे. त्या म्हणाल्या की, “ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे आहे. येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा केली जाते. मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते.महापौर किशोरी पडेणेकर यांनी स्थानिक आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू दादा सपकाळ, सुधीर साळवी यांनी केलेल्या सहकार्याचे मनापासून आभार मानले आहेत. त्यासोबतच रुग्णालयाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर, वरिष्ठ ह्दयरोग तज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी, अस्थिरोग तज्ञ डॉ. श्रीधर आर्चिक, पोटविकार तज्ञ डॉ. अमित मायदेव, यकृत तज्ञ डॉ. आकाश शुक्ला, ग्लोबल रुग्णालयाचे परिचालन प्रमुख अनुप लॉरेंस, परिचारिका विभागाच्या प्रमुख जेसिका डिसूझा या सर्वांचे सुद्धा महापौरांनी आभार मानले आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 20, 2021, 6:39 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *