Breaking News

नाली पाडा येथील पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीची करणार चौकशी

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 2, 2021 10:58 pm
|

विक्रमगड: ग्रुप ग्रामपंचायत ओंदे अंतर्गत येणाऱ्या नाली पाडा येथील पुलाची चार महिन्यापुर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. ही दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असल्याने. चार महिन्यात या पुलाची दुरावस्था झाली आहे. हा पुल जिल्हा परीषद अंतर्गत बांधण्यात आला आहे. या आधी ही या पुलावर जिल्हा परीषद अंतर्गत पुल दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. असे असतांना पुन्हा या पुलावर चार महिन्यापुर्वी ग्रामपंचायत निधी मधुन दुरुस्तीचे काम करण्यात आल्याचे या बाबत येथील ग्रामस्थांनी या भागातील जिल्हा परिषद सदस्य गणेश कासट यांना तक्रार करताच त्यांनी तात्कळ याची दखल घेऊन पालघर जिल्हा परीषदच्या बांधकाम सभापती शितल धोडी पंचायत समिती सदस्य अंजली भोये यांच्या सोबत त्यांनी नाली पाडा येथील पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीची केली पाहणी. निकृष्ट कामाची सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

प्रतिक्रिया:-

ओंदे ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना गरजेच्या विकास कामावर निधी खर्च न करता नको असलेल्या कामावर निधी खर्च झालेल्या निदर्शनास येत आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट असल्याचे दिसत आहेत.
-गणेश कासट
(जिल्हा परीषद सदस्य)

प्रतिक्रिया:-

नाली पाडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम बघितले आहे. हे निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे दिसत आहे. या पुलावर खर्च करण्यात आलेल्या निधीच्या चौकशीचा आदेश मी देणार आहे.
-शितल धोडी
(सार्वजनीक बांधकाम सभापती जिल्हा परीषद पालघर)

प्रतिक्रिया,

मला अजून ओंदे ग्रामपंचायतीचा कार्यभार देण्यात आलेला नाही, ग्रामपंचायतीकडून या पुलाच्या दुरुस्तीसाठी किती खर्च करण्यात आला या बाबत मला काही सांगता येणार नाही.
-संदिप सुतार
(ग्रामसेवक ग्रामपंचायत ओंदे)

प्रतिक्रिया:-

नाली पाडा या पुलाची मी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. संबंधितांना या बाबत मी निर्देश दिले आहेत. मात्र या पुलाच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतने किती खर्च करण्यात आला या बाबत मला सांगता येणार नाही.
-ईश्वर पवार
(सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती विक्रमगड)

प्रतिक्रिया:-

मी या पुलाच्या दुरावस्थे बाबत पाहणी केली आहे. या पुलाचे खड्डे भरण्यास सांगितले आहे. या पुलाच्या दुरुस्तीवर किती खर्च झाला हे ग्रामपंचायत दप्तर बघितल्या नंतरच सांगता येईल.
-मनोज अंभोरे
(शाखा अभियंता, बांधकाम विभाग पंचायत समिती विक्रमगड)


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 2, 2021, 10:58 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *