येत्या 3-4 दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा अधिकच जाणवणार : राजेंद्र शिंगणे
मुंबई: राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात येत्या तीन ते चार दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. लस केव्हा आणि कशी वापरायची याचा प्रोटोकॉल पाळल्या जात नसल्याने पॅनिक स्थिती निर्माण झाल्याची सविस्तर माहिती अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना दिली.
रेमडेसिवीरबाबत आम्ही टेंडर मागविले आहेत. मात्र रेमडेसिवीरच्या किंमतीबाबत कंपन्यांचा गैरसमज झालेला आहे. आम्ही कमी किंमतीत रेमडेसिवीर खरेदी करणार नाही. आम्हाला कंपन्यांचं नुकसान करायचं नाही, असं शिंगणे यांनी सांगितलं. राज्यात रेमडेसिवीरचा साठा कमी असून येत्या 3-4 दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा अधिकच जाणवणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
तसेच, “नुकतीच माझी काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशाप्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? कारण साधरण तीन आठवड्यांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली होती. त्यावेळेस मला त्यांनी पुढील १५ तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिला होता. त्या कार्यक्रमानुसार दररोज ते महाराष्ट्रात ५५ हजार रेमडेसिवीर पुरवतील अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंत कालच्या तारखेपर्यंत सरासरी जर आपण पाहिली, तर ३७ ते ३९ हजारपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवलं आहे.” असंही डॉ.शिंगणे यांनी सांगितलं.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 16, 2021, 6:15 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY