भारतासोबतच्या विसंवादाबाबत इम्रान खान म्हणाले; किती वर्षे आम्ही सुसंस्कृत शेजारी होण्याची वाट पाहत आहोत, पण काय करावे, RSS ची विचारधारा…
ताश्कंद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सध्या उझबेकिस्तानमधील ताश्कंदमध्ये मध्य आणि दक्षिण आशिया परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यावेळी इम्रान खान चाललेले असताना एएनआय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने त्यांना अडवून दहशतवाद आणि भारत – पाकिस्तान चर्चा हातात हात घालून चालू शकतात का, हा थेट प्रश्न विचारला. त्यावर मागे वळून ते उत्तरले, की आम्ही म्हणजे पाकिस्तान तर किती वर्षे वाट पाहतोय की भारत आणि पाकिस्तान नागरी प्रशासनात उत्तम शेजाऱ्यासारखे राहिले पाहिजे. पण आम्ही काय करणार दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये भारतातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी RSS ideology आडवी येते आहे.
एवढे बोलून इम्रान खान निघून गेले. पण तेवढ्यात तेथे छोटे नाट्यही घडले. दहशतवाद आणि तालिबान यांच्या बाबतचे प्रश्न विचारत एएनआयचा पत्रकार आणि कॅमेरामन इम्रान खान यांच्या मागे गेला.मात्र पाकिस्तानाने पाळलेल्या दहशतवाद्यांचा प्रश्नावर उत्तर देणे टाळले. तालिबान संदर्भातील प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले नाही. इम्रान खान यांच्या सुरक्षा रक्षकांनी या पत्रकाराला आणि कॅमेरामनला अडविण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद तर म्हणाले देखील अब बस कर यार…!!इम्रान खान यांच्या नेमक्या प्रश्नांना उत्तरे देण्याची टाळाटाळ ताश्कंदमध्ये, पाकिस्तानात आणि भारतात चर्चेचा विषय बनली आहे.
#WATCH Pakistan PM Imran Khan answers ANI question, 'can talks and terror go hand in hand?'. Later he evades the question on whether Pakistan is controlling the Taliban.
Khan is participating in the Central-South Asia conference, in Tashkent, Uzbekistan pic.twitter.com/TYvDO8qTxk
— ANI (@ANI) July 16, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 16, 2021, 5:57 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY