‘राज ठाकरे माझ्या घरी चहासाठी आले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस असेल’
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंजवर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले आजची भेट सदिच्छा भेट होती. भाजप-मनसे युतीबाबत कुठलाही प्रस्ताव नव्हता. अशा गोष्टी घडण्यासाठी योग्य वेळेची गरज असते. राज ठाकरेंसोबत नाशिकला अचानक भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी घरी यायचं आमंत्रण दिलं होतं. घरी चहा प्यायला बोलावणं ही महाराष्ट्राची संस्कृती, पंरपरा आहे. त्यानंतरच्या आमंत्रणानंतर आज भेटायला आलो.
परप्रातीयांद्दलच्या काही भूमिका मला समजून घ्यायच्या होत्या. कुठल्याही माणसाच्या दोन भूमिका असतात, एक माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून.. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकांवर चर्चा करायची होती. त्यासाठी आजची भेट झाली. दरम्यान, पत्रकारांनी विचारले राजकीय चर्चांच्या शिवाय आणखी काय बोलणं झालं. यावर चंद्रकांत पाटलांनी सांगितलं, राज ठाकरेंना आपण चहासाठी घरी येण्याचं निमंत्रण दिलंय . राज ठाकरे माझ्या घरी चहासाठी आले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस असेल असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.
मात्र राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेते व्हावे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आणि भाजपची आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबद्दल आपली भूमिका व्यापक करावी, ही अपेक्षा व्यक्त केली, अशी माहिती पाटील यांनी दिली.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 6, 2021, 3:32 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY