पूजा चव्हाण आत्महत्या : माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांची ‘क्लीन चिट’?
पुणे : पुण्यातील वनवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येसाठी विरोधकांनी थेट शिवसेना आमदार संजय राठोड यांना जबाबदार धरले. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता मात्र, पूजाच्या आई-वडिलांनी तिच्या मृत्यूबाबत कुणावरही संशय नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आई-वडिलांनी आपला जबाब नोंदवला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यू संदर्भात आपल्याला कुठलाही संशय नाही असा जबाब तिच्या पालकांनी नोंदवला. तरीही पोलिस यासंदर्भात सविस्तर तपास करत आहेत.
पुण्यात केली होती आत्महत्या
टिक-टॉक स्टार राहिलेली पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारी रोजी पुण्यातील वनवडी परिसरात एका फ्लॅटच्या गॅलरीवरून उडी घेत आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणाला महाविकास आघाडीतील तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्याशी जोडण्यात आले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी राठोड यांचे नाव घेऊन आरोप केले. त्यांच्या कथित फोन संभाषणाच्या ध्वनीफीत देखील जारी केल्या. वाढत्या दबावामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.
दरम्यान ,परिस्थिती पूर्णपणे आता बदलली असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्याचा विचारही केला जाऊ शकतो.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 16, 2021, 6:43 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY