Breaking News

देवेंद्र फडणवीस यांची मेयो, मेडिकल अधिष्ठाता यांच्याशी चर्चा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 17, 2021 8:48 pm
|

नागपूर, : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नागपूर येथे मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अन्य अधिकाऱ्यांशी एकूणच परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली.

या दोन्ही रुग्णालयात दाखल होत असलेले रुग्णांचे प्रमाण, उपलब्ध सुविधा आणि इतरही एकूणच स्थितीचा आढावा घेत, प्रशासनाकडून वा सामाजिक क्षेत्रातून काय मदत लागणार यासंदर्भातील तपशीलवार माहिती त्यांनी घेतली.

आमदार प्रवीण दटके, मेयोचे अधिष्ठाता डॉ. केवडीया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. पी पी जोशी, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. लांजेवार इत्यादी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नागपूर येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पदाधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली आणि आणखी २०० खाटा वाढविण्यासंदर्भात नियोजन कसे करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा केली. आयएमएने केवळ तज्ञ मनुष्यबळ द्यावे आणि बाकी सुविधा तसेच इतर मनुष्यबळ महापालिका देईल, असे यावेळी सांगण्यात आले. डॉक्टरांना या काळात येत असलेल्या अडचणी, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा याबाबत सुद्धा आयएमएने माहिती दिली. आमदार प्रवीण दटके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. काटे आणि डॉ. निखाडे उपस्थित होते.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गांधीनगर, नागपूर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली आणि एकूणच व्यवस्थेची माहिती घेत आढावा घेतला. महापौर दयाशंकर तिवारी आणि अन्य लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या रुग्णालयात 96 कोविड रुग्ण सुद्धा दाखल आहेत आणि सद्या लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. 1194 कोविड रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून सुमारे 23,000 लसीकरण झाले आहे. येणाऱ्या काळात आयसीयू सुविधा निर्माण करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुभाष नगर लसीकरण केंद्राला भेट दिली आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 17, 2021, 8:48 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *