Breaking News

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांना दोन कोटीचा दंड, बांधकाम कंपनीची बदनामी केल्याचा आरोप

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 22, 2021 3:04 pm
|

बंगळूर : एका बांधकाम कंपनीची बदनामी करून नुकसान केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी कंपनीला दोन कोटी रुपये द्यावेत, असा आदेश अतिरिक्त शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने दिला आहे.

नंदी इंफ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर इंटरप्रायजेस, असे कंपनीचे नाव आहे. २०११,मध्ये देवेगौडा यांनी कंपनीविरोधात एका वाहिनीवर वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कंपनीचे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. देवेगौडा सुद्धा न्यायालयात त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण किंवा खुलासे करण्यात अपयशी ठरले होते. तसेच देवेगौडा यांनी भविष्यात अशी विधाने करू नयेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान, आठव्या पालिका दिवाणी व सत्र न्यायाधीश मल्लनागौडा यांनी एनआयएसने दाखल केलेल्या खटल्यावर हे निर्देश दिले. या कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक खेणी हे बिदर दक्षिणचे माजी आमदार आहेत.कन्नड वृत्तवाहिनीवर २८ जून २०११ रोजी प्रसारित झालेल्या मुलाखतीचा संदर्भ देताना न्यायालयाने देवेगौडा यांना निंदनीय टीकेमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला झालेल्या नुकसानीबद्दल कंपनीला दोन कोटी रुपयांचे नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. २०११ मध्ये एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत माजी पंतप्रधानांनी दिलेल्या वक्तव्याविरूद्ध एनआयसीने दावा दाखल केला होता.जनता दल (सेक्युलर) च्या प्रमुखांनी एनआयएस प्रकल्पांना लक्ष्य केले होते आणि त्यास ‘लूट’ असे म्हटले होते. विशेष म्हणजे कंपनीच्या प्रकल्पाबाबत कर्नाटक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले असताना देवेगौडा यांनी बदनामीकारक वक्तव्य करून कंपनीचे नुकसान केले . कोर्टाने 17 जूनच्या निर्णयामध्ये म्हटले आहे की, कंपनीचा प्रकल्प मोठा असून कर्नाटकच्या हितासाठी आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 22, 2021, 3:04 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *