महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही ; प्रवीण दरेकरांची टीका
मुंबई : भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे . “सह्याद्री अतिथीगृह हे सरकारचं प्रमुख बैठकांचे ठिकाण आहे. सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला. अशा ठिकाणचा स्लॅब कोसळत असताना जर सरकारला कळत नसेल तर हा आमचं सरकार पडणार नाही म्हणणाऱ्या सरकारसाठी हा संकेत आहे की काय असं दिसतंय. असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते .
ते म्हणाले “देवेंद्र फडणवीस हे राज्याचे सक्षम मुख्यमंत्री होते. सध्या विरोधी पक्षातही ते चांगलं काम करत आहेत. त्यांना आणि भाजपला एक जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्ट्रेशनमध्ये जाण्याचं काहीच कारण नाही. आमच्या अशी टिपण्णी करणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सध्या त्रस्त असल्याचं दिसत आहे. फ्रस्ट्रेशन हे चेहऱ्यावर दिसतं. फडणवीस आणि भाजप नेते वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे करत आहेत. आमचे नेते प्रसन्न चेहऱ्याने वावरत आहे. जनतेची विचारपूस करत आहेत. पण मुंबईच्या महापौर आणि काही नेतेमंडळीच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रकारचा त्रास दिसतोय”, असा टोला त्यांनी पेडणेकर यांना लगावला.
दरम्यान मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. सह्याद्री अतिगृहात यावेळी बैठक सुरू होती. या ठिकाणी असलेल्या हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅबसह झुंबर अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. या घटनेवेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची बैठक सुरु होती . याचवेळी पीओपी स्लॅबसह झुंबर खाली कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही. यानंतर सह्याद्री अतिगृहात असलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर हलवण्यात आले .
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 5, 2021, 4:41 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY