उद्धव ठाकरे रडत लक्ष्मी, अनिल परब सेवाभावी मंत्री; नारायण राणेंची टीका
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक राहिली आहे, परंतु याबद्दल सतत राजकारण सुरू आहे. आता भाजपाचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रडत लक्ष्मी आहेत. तर अनिल परब हे सेवाभावी आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
एकदा शिवसेना आणि कॉंग्रेसचे सदस्य झाल्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी कोरोनाच्या मुद्यावरून महाविक्रस आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारने लागू केलेल्या संचारबंदीवर टीका केली आहे. संचारबंदीच्या निर्णयाने राज्यातील जनता समाधान होणार आहे का? त्यामुळे त्यांचं पालनपोषण होणार आहे का? दीड हजारात लोकांचं पोट कसं भरणार? राज्यातील कामगार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील कोरोना बळींची वाढती संख्या हे उद्धव ठाकरे सरकारचं पाप आणि अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली. दुकाने बंद करायची तर जीएसटी का आकारली जातेय? दुकानदारांना नोटीस का पाठवत आहात? असा सवाल त्यांनी केला.
अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. जमा करण्याचं आणि आणून द्यायचं काहीही कमिशन न घेता. म्हणून त्यांची चौकशी करावी. सेवा आणि मेवा कसा जमा केला, कुठून नेऊन पोहोचवला याची चौकशी झाली पाहिजे, असं ते म्हणाले. दीड हजार घ्या, पाचशे घ्या. शंभर घेऊन जा. हे काय आहे? चेष्टा आहे लोकांची. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा असू शकतो? रडत लक्ष्मी. अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान ,आज भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी अनिल परब यांच्याविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. अनिल परब यांना NIA उचलून नेणार, असे भाकीत नारायण राणे यांनी आज केले आहे. त्यामुळे देशमुख यांच्यापाठोपाठ परब यांचीही चौकशी होणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 16, 2021, 6:52 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY