कर्नाटकच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान; म्हणाले , आम्ही तुम्हाला वाचवू शकत नाही, कोरोनाला आत्मविश्वासाने पराभूत करावे लागेल!”
कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कट्टी हे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत . यावेळी त्यांनी कोरोनाच्या रूग्णांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. ते म्हणाले, ‘ज्या लोकांनकडे आत्मविश्वास कमी आहे, त्यांना आम्ही या साथीच्या आजारांपासून वाचवू शकणार नाही.’ COVID-19 वर कर्नाटकातील बिल्गी तालुक्यातील अधिकाऱ्यासमवेत झालेल्या बैठकीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलय.
त्यांनी पत्रकारांना म्हटले की, “जरी आपण रेमेडीव्हीरचे सहा इंजेक्शन्स दिलीत तरी लोक मरणार आहेत.” आम्ही अशा रुग्णांना वाचवू शकणार नाही, ज्या लोकांनकडे आत्मविश्वास नाही आणि आपण अशा लोकांनमध्ये आत्मविश्वास वाढवूही शकत नसल्याने अशा लोकांचे जीव वाचवू शकत नाही. अशा लोकांमुळे कोरोना संसर्गात वाढ होत आहे. ” त्याच वेळी, रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्याशी कोविड -19 रूग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन कंसंट्रेटर संदर्भात वचारले असता मंत्री म्हणाले की कोरोनाची तिसरी लाट येईल, तेव्हा पाहू.
यापूर्वीही मंत्र्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ज्यात ते एका शेतकऱ्याला मरणाचा सल्ला देताना दिसले . शेतकऱ्याने सार्वजनिक वितरण यंत्रणेमार्फत देण्यात येणा ऱ्या तांदळाचे प्रमाण 5 किलो वरून 2 किलोवर आणण्यासंदर्भात मंत्र्याला फोन केला होता . त्यावेळी कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सद्य: निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने येत्या दोन महिन्यांत धान्याचा अधिक पुरवठा करणार असल्याचे आश्वासन मंत्र्याने दिले होते. यावर शेतकऱ्याने मंत्र्याकडे विचारले. की, धान्याचा अधिक पुरवठा कधीपर्यत येणार आहे, तोपर्यत काय करू ? आम्ही तोपर्यंत मरू का? असा प्रश्न केला असता यावर मंत्र्यांनी उत्तर दिले की तुम्ही मेलेले बरे. त्याचवेळी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मंत्र्यांच्या या कथित ऑडिओ विधानाबद्दल खेद व्यक्त करत यासंदर्भात चोकशी करण्याची मागणी केली.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 10, 2021, 12:58 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY