Breaking News

तब्बल 41वर्षानंतर हॉकीच्या सामन्यात भारताचा जर्मनीवर ऐतिहासिक विजय,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संघाचं अभिनंदन

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 5, 2021 1:03 pm
|

मुंबई, :-भारतीय पुरुष हॉकी संघानं ४ दशकांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदकावर भारताचं नाव कोरलं आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा धुव्वा उडवत ५:४ असा विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाने मोठा इतिहास रचला आहे. भारताने १९८० साली पहिल्यांदा हॉकीमध्ये पदक मिळवले होते यानंतर आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्य पदक मिळवले आहे. भारताने शानदार खेळी करत ५:४ ने जर्मनीचा पराभव केला आहे. जर्मनीविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय टीमने संघात कोणताही बदल केला नव्हता. मात्र आपल्या उत्तम खेळीने भारताला पदक मिळवून दिलं आहे.भारतीय हॉकी संघाच्या विजयात कर्णधार मनप्रीत, गोलरक्षक श्रीजेश आणि प्रशिक्षक ग्रहम रीड यांनी मोठा वाटा उचलला.

दरम्यान , “भारतीय पुरुष हॉकी संघानं संघर्षपूर्ण खेळत ऑलिंपिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. 41 वर्षांची प्रतिक्षा, प्रयत्न, परीश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकानं देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेनं ही नवी सुरुवात ठरेल.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भारतीय पुरुष हॉकी संघाने कधीकाळी ऑलिंपिकची आठ सुवर्णपदके जिंकली होती. 1980च्या शेवटच्या पदकानंतर पदक जिंकण्यासाठी आजपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. गेल्यावेळच्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीविरुद्ध 1-3 अशा गोल पिछाडीवर असतानाही संघाने 5-4 गोलफरकाने मिळवलेला विजय हा दूर्दम्य इच्छाशक्ती, संघभावना, कठोर परीश्रमांचे फळ आहे. भारतीय खेळाडूंनी आज देशवासियांची मने जिंकली आहेत. मी सर्व खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफचे अभिनंदन करतो. भविष्यातील सुवर्ण कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय हॉकी संघाचं कौतुक केले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 5, 2021, 1:03 pm
Tags: Tags: ,
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *