Breaking News

विद्यार्थ्यांना दिलासा; महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रिशिपसाठी अर्ज करण्यास 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 18, 2021 7:49 pm
|

मुंबई,: कोविड -19 च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यासाठी दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी प्रणाली मार्फत राबविल्या जातात. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षांमध्ये विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व फ्रिशिपकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च देण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. हे निदर्शनास येताच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास आता दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. तरी विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 18, 2021, 7:49 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *