Breaking News

Covid: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील निर्बंध कायम राहणार – अजित पवार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 16, 2021 2:52 pm
|

पुणे– कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात निर्बंध कायम राहणार , अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला भेट दिली. याठिकाणी नव्यानं उभारण्यात आलेल्या सुविधा व साधनसामग्रीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी उपस्थित वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

त्यानंतर करोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात काही भागात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच कायम ठेवण्यात आले आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत दुकाने उघडता येतील. शनिवार, रविवारी वीकेंडला अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद राहतील.

कोरोनाबाधित रुग्णांचे गृह विलगीकरण न करता संस्थात्मक विलगीकरण झाले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्यांच्या घरात स्वतंत्र खोल्या, बाथरूम नाहीत, त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे. उद्योगांनी कामगारांना लसीचे दोन्ही डोस देऊन उद्योग सुरू करावेत.

एका हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केली. परंतु कुणी आत्महत्या करावी असे सरकारला वाटते का ? अलीकडच्या काळात आत्महत्या झाली की त्याला सरकारला जबाबदार धरले जाते. नेमके कारण पण बघितले पाहिजे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यास निर्बंध शिथिल करण्यात येतील.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री सपत्नीक पुजा करणार

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री सपत्नीक पूजा करतील. वारकरी संप्रदायाचे आभार मानतो त्यांनी सहकार्य केले. यावेळी वारीसाठी निर्बंधात थोडी सूट देण्यात आली होती. आपल्या परंपरा टिकवण्याचा आपण प्रयत्न करुया. बकरी ईदसाठी मागच्या वर्षीप्रमाणे धोरण कायम असेल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. आतापर्यंत म्हणावा तसा पाऊल पडला नाही. धरणं भरलेली नाहीत, खडकवासला, वरसगाव टेमघर 30 ते 40 टक्के भरले आहेत. धरणं भरल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही. त्यामुळे थोडीशी चिंता आहे, असंही ते म्हणाले.

बकरी ईदबाबत गतवर्षीचेच धोरण :

२१ तारखेला बकरी ईद आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदसाठी गेल्यावर्षीसारखंच धोरण असेल असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

मॉल सुरू करण्याबाबत विचार करू :

कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता सध्या मॉल बंद ठेवण्यात आले आहेत. मॉलमध्ये एखादा व्यक्ती काही खरेदी करायला गेल्यास तो सर्वत्र फिरत बसतो. त्यामुळे मॉल सुरू करण्यास परवानगी नाही. तथापि लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मॉलमध्ये प्रवेश देता येईल का, याबाबत विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील मोनोरेल प्रकल्पाला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही,नसला तरी प्रकल्प खासगी संस्थेकडे चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 16, 2021, 2:52 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *