Breaking News

चेंबूर- विक्रोळीतल्या दुर्घटनेवर महापौर किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 18, 2021 2:28 pm
|

मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी रात्री उशिरा चेंबूर आणि विक्रोळी भागात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेमध्ये दोन्ही ठिकाणी मिळून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर प्रतिक्रियाा देताना महापौर म्हणाल्या की, महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नाहीत. मग अशावेळी महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते त्यावेळी त्याला विरोध होतो. चेंबूरमधील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं. त्य ाठिकाणच्या नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगण्यात आलं होतं. तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं,” असं त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेऊन किमान पावसाळ्यात तरी दुसरीकडे चला असं सांगण्यात आलं होतं. इतर ठिकाणीही लोकांना दरवर्षी दुसरीकडे स्थलांतरित केलं जातं. त्यामुळे स्वतः जीव वाचवण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेतली पाहिजे. घडलेली घटना वेदनादायी आहे, पण नागरिकांनी महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे,” असंदेखील त्या म्हणाल्या. कोसळत आहे.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येक दोन लाख व जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये व जखमींना मोफत उपचारांची घोषणा केली आहे. मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनीही घटनेवर दु:ख व्यक्त करत त्या ठिकाणच्या लोकांना महापालिका अधिकऱ्यांनी आधी तीन वेळा इशारा दिल्याचे सांगितले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 18, 2021, 2:28 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *