Breaking News

Breaking news :11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 9, 2021 4:22 pm
|

एमपीएससी परीक्षेविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सर्व स्तरांमधून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक बोलावली होती. या बैठकीमध्येच हा निर्णय झाला असल्याचे वृत्त आहे. तसेच या परीक्षा नंतर कधी घेतल्या जातील, त्याविषयी देखील निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असेही या बैठकीमध्ये ठरले असल्याची माहिती आहे.

दरम्यान यापूर्वी एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. यानंतर सरकारने परीक्षा लवकरात लवकर घेतल्या होत्या. मात्र यावेळी विद्यार्थ्यांची उलट भूमिका होती. परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली जात होती. यामुळेच कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील काही कॅबिनेट मंत्र्यांनी देखील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली . राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एप्रिल महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा रद्द करून नव्याने नियोजन करावे, अशी मागणी होती तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधत एमपीएससीच्या परीक्षांविषयी महत्त्वाची मागणी केली होती. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे दोन दिवसांनी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेबाबत राज्य सरकारने योग्य भूमिका घ्यावी,’ अशी विनंती राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 9, 2021, 4:22 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *