अनिल देशमुख भुजबळांच्या वाटेवर तर अनिल देशमुखानंतर, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकरांना यांनाही त्याच वाटेवर जावे लागणार
मुंबई अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी आज सकाळी छापे टाकले. ईडीचे अधिकारी गेल्या चार तासांपासून तपास करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या पत्रपरिषदेत म्हणालेकाही दिवसात अनिल देशमुख यांना अटक होईल,. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब (Anil Parab), मिलिंद नार्वेकरांची (Milind Narvekar) सीबीआय (CBI) चौकशी करा, अशी मागणी देखील सोमय्यांनी (Kirit Somaiya) केली आहे.
अनिल देशमुख छगन भुजबळांच्या वाटेवर आहेत. छगन भुजबळांना सर्वोच्च न्यायालयानेही तीन वर्षे तुरूंगात ठेवले होते. छगन भुजबळांनी १०० कोटी घोटाळ्याचे, महाराष्ट्र सदन आणखी घोटाळ्याचे पैसे कोलकात्याच्या कंपनींद्वारे स्वतःच्या परिवाराच्या कंपनीत वळवले होते. अनिल देशमुख यांनी देखील कोट्यावधी रुपये, ते वाझे वसुली गँग असो की अन्य घोटाळे असो, त्याचा पैसा कोलकात्याच्या कंपनीत वळवला. देशमुख परिवाराने त्या पैशांनी मोठाले उद्योग, राज्य बांधण्या ऐवजी इमारत बांधण्याची सुरूवात केली. ज्यांनी काळ्याचे पांढरे केले, त्याच सीए व बोगस कंपन्यांनी मान्य केले की कॅश देऊन चेक देत होते. त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठता व प्रतीक्षा राज्यातील जनतेला आहे, असे सोमय्या म्हणालेत.
तर पुढे किरीट सोमय्या म्हणालेत – अनिल देशमुखानंतर, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकरांना यांनाही त्याच वाटेवर जावे लागणार आहे. दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर मिलिंद नार्वेकर भव्य बंगला बांधत आहेत. या बंगल्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील साडेचारशे झाड कापली. आज त्या जागेची किंमत १० कोटी आहे. दोन मजली बंगल्याचे बांधकाम सुरू आहे आणि बहुतेक त्याला मार्गदर्शन पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरेंचे आहे! कोणत्याही प्राधिकरणाकडून परवानगी घेतलेली नाही. अनिल परब यांच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जात असतात व मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात, आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे घेतात! असा घणाघात सोमय्या यांनी केला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 25, 2021, 2:59 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY